यावल : तालुका प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसात म्हणजे काल आणि आज यावल ग्रामीण रुग्णालयात एकूण 15 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.या कोरोना बाधित रुग्णांना होम क्वॉरनटाईन राहण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला असला तरी प्रत्यक्षात हे रुग्ण घरी क्वारनटाईन राहतील का…? असे अनेक प्रश्न जनतेत उपस्थित केले जात आहेत.
काल दि.28 रोजी यावल शहरात श्रीराम नगर मध्ये 2,सुंदर नगरीमध्ये 1, बोरावल गेट परिसरात 2, नगिना मस्जिद परिसरात 1, ड़ांगपुरा भागात 1, निमगाव येथे 1, सातोद येथे 2 अशा दहा रुग्णांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत.
आज दि 29 रोजी बोरावल गेट परिसरात पुन्हा 2, संभाजी पेठ 1, डांगपुरा एक येथे 1,विरावली येथे 1 अशा एकूण पाच रुग्ण कोरोना बाधित असल्याचे यावल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांकडून समजले,या रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे त्यांनी घरी क्वारंटाईन राहायचे असा सल्ला वैद्यकीय सूत्रांनी दिला असला तरी कोरोना बाधित रुग्ण घरातच थांबतील का? ते रुग्ण कोणाच्याही संपर्कात येणार नाहीत का? याबाबत सर्व स्तरातून संशय व्यक्त करण्यात येत असून कोरोनाची चौथी लाट कासव गतीने येत आहे का? इतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना कोरोना रुग्णांची माहिती होईलच याबाबत इतर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.तरी याबाबत शासनाने,आरोग्य विभागाने ठोस निर्णय घेऊन कोरोनाचे रुग्ण वाढणार नाही याबाबत कार्यवाही करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.