सोयगाव : तालुका प्रतिनिधी (विजय चौधरी)
जरंडी,ता.२८…शेतात जाण्याचा रस्ताच संबंधित ठेकेदाराने बंद केल्याने रस्त्यासाठी बहुलखेड्याच्या त्या पाझर तलावात जल समाधीच्या पावित्र्यात असलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी रस्त्यासाठी अखेर तहसील कार्यालयाचे दरवाजे ठोठावून आम्हाला रस्ताच द्या अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार रमेश जसवंत यांचेकडे मंगळवारी ता.२८ केली आहे.
बहुलखेडा गावालगत असलेल्या पाझर तलावातून असलेला शेताकडे जाण्याचा रस्ताच संबंधित ठेकेदाराने बंद केल्याने व जुना वापरता रस्ता पाझर तलावाच्या पाण्याखाली बुडत असल्याने या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्ताच उपलब्ध नसल्याने या दोनशे शेतकऱ्यांना डोक्यावर खताच्या गोण्या व खरिपाच्या पिकांचे उत्पन्न घेवून यावे लागते वेळ प्रसंगी या पाझर तलावाने पाण्याची धोकादायक पातळी गाठल्यास हा रस्ताच बंद होतो त्यासाठी तलावात पाणी साचण्या आधीच शेतात जाण्यासाठीचं रस्त्यासाठी बहुलखेड्याच्या त्या दोनशे शेतकऱ्यांचा शेतात जाण्याच्या रस्त्यासाठी दोन दिवसापासून संघर्ष सुरु आहे.सोमवारी या संतप्त शेतकऱ्यांनी जल समाधी घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र महसूलचे मंडळ अधिकारी मारोती धोंडकर यांनी त्यांची समजूत घालत त्यांना आंदोलन करण्यापासून दूर केले मात्र तरीही संबंधित ठेकेदार हा मनमानी करून शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून देत नसल्याने मंगळवारी त्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाचे दरवाजे ठोठावले होते.
यामागणी वर तहसीलदार रमेश जसवंत यांनी या शेतकऱ्यांना सकारात्मक उत्तर देवून पर्यायी रस्ता देण्याचे आश्वासन दिले आहे.निवेदनावर छगन जाधव,रवींद्र पाटील,चरणदास चव्हाण,सुरेश पाटील,राहुल राठोड,पवन राठोड,शेषःमल जाधव,रमजान शेख,देविदास राठोड,भाईदास राठोड,विनोद पवार.विनोद राठोड,चरणदास राठोड,मखराम राठोड,आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.