साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी
शहरातील सारस्वत समाज बांधवांनी सामाजीक व शैक्षणीक उपक्रमांसाठी खुल्या भुखंडाची मागणी नगरपालीकेकडे केली असुन मुख्याधीकारी चंद्रकांत भोसले यांना सोमवारी निवेदन दिले.
समाजाच्या शिष्टमंडळाने या बाबत आमदार गिरीश महाजन, नगराध्यक्ष साधना महाजन व उपनगराध्यक्ष प्रा शरद पाटील यांची भेट घेऊन मागणी केली असता त्यांनी अनुकुलता दर्शवीली आहे.
मुख्याधीकारी भोसले यांना निवेदन देतांना जगदीश शर्मा, राजु शर्मा, मोहन सारस्वत, कैलास शर्मा, महेंद्र शर्मा, निलेश शर्मा, जीतू शर्मा, एड.अनिल सारस्वत, मनोज शर्मा, अनिल शर्मा, रमेश शर्मा आदी उपस्थीत होते.