यावल : प्रतिनिधी
तालुक्यात नावरे गावात काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसात एका महिलेच्या अंगावर वीज कोसळून तिचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की नावरे ग्रामपंचायत महिला सदस्य रेखा ताई मेढे हिची बहिण रीनाबाई सुनील मेढे वय 39 हीच्या अंगावर आज दुपारी वादळी पाऊस सुरू असताना अचानक वीज कोसळली असता तिला तात्काळ यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले,या घटनेमुळे संपूर्ण नावरे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.