Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»खान्देशची मुलुख मैदान तोफ पाटील व आ.चंद्रकांत पाटील कव्हरेज क्षेत्रा बाहेर
    जळगाव

    खान्देशची मुलुख मैदान तोफ पाटील व आ.चंद्रकांत पाटील कव्हरेज क्षेत्रा बाहेर

    SaimatBy SaimatJune 22, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राज्यात गेल्या दोन दिवसापासून राजकीय वातावरण एकनाथ शिंदे यांनी तापवून ठाकरे सरकारला गॅसवर ठेवले होते तर आज खान्देशची मुलुख मैदान तोफ जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज नॉट रिचेबल झाले असून त्यांनी आपल्या समर्थकांना जय महाराष्ट्र असा मेसेज केल्याचे समजते. ना.गुलाबराव पाटलांसोबत असलेले मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील हे देखील आज नॉट रिचेबल झाले आहेत. दोन्ही नेते गुवाहाटीच्या दिशेने निघाल्याचे सांगण्यात येत आहे.

    नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याचे वृत्त माध्यमातून झळकत होते. नगरविकास खात्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या कामात होत असलेल्या ढवळाढवळला ते कंटाळले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी याबाबत बोलून दाखविले होते. पक्षप्रमुख मनावर घेत नसल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषद निवडणूक आटोपताच नॉट रिचेबल झाले होते. शिंदे यांच्यासोबत असलेल्या ३० पेक्षा अधिक आमदारांचा फोटो आणि व्हिडीओ आज सकाळी व्हायरल झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील तीन आमदार त्यात असल्याचे स्पष्ट झाले होते.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले काही मंत्री आणि आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे वृत्त सकाळपासून समोर येत होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे वृत्त काल प्रकाशित होत होते, दुपारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील दिसून आले होते. माध्यमांना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देखील दिली होती. गुलाबराव पाटील यांची मुलुख मैदान तोफ अशी देखील ओळख आहे.

    दरम्यान, आज पुन्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील नॉट रिचेबल झाल्याचे वृत्तसमोर येत असून जळगाव लाईव्हने संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद येत आहे. गुलाबराव पाटील यांच्यासोबत काल दिसून आलेले मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील हे देखील नॉट रिचेबल येत आहे. जळगावातील सेनेची चारही आमदार फुटल्याचे निश्चित झाल्यानंतर शेवटचे आमदार देखील फुटल्याची शक्यता व्यक्त होत आहे. एका वृत्तानुसार आ.चंद्रकांत पाटील मुंबईच्या दिशेने निघाल्याचे सांगण्यात येत असून दुसरीकडे त्यांना ना.एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याचे देखील म्हटले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026

    Jalgaon : जळगावात एचपीव्ही लसीकरण मोहिमेची धडक सुरुवात १४ वर्षांखालील मुलींना मोफत लस

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.