यावल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित भव्य योग शिबीरास यावल येथे उत्तम प्रतिसाद

0
24

यावल प्रतिनिधी 
दि.21जुन 2022मंगळवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल तालुका वतीने यावल शहरातील खंडेराव महाराज मंदिरा सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान पाणी फिल्टर हाऊस,बोरावल रोडजवळ,यावल येथे भव्य योग शिबिराचे आयोजन केले होते शिबिरास नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
संयुक्त राष्ट संघाच्या बैठकीत भारताचे लोक प्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा असा प्रस्ताव मांडून 11 डिसेंबर2014ला हा प्रस्ताव मान्य करून दरवर्षी21 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे आव्हान श्री नरेंद्र मोदीजी यांनी जनतेला केले होते.
आज 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल तालुक्याच्या वतीने भव्य योग शिबिराचे आयोजन यावल शहरातील खंडेराव महाराज मंदिर जवळ,पाणी फिल्टर हाऊस,बोरावल रोड येथे केले होते.शिबिराचे उद्धघाटन प्राणायामाने करण्यात आले.या शिबिरात यावल शहर व परिसरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना पूरक व्यायामा बरोबर विविध प्रकारची आसने शिकविण्यात आली.त्यांचे सादरीकरण या वेळी करण्यात आले.त्याच प्रमाणे योगाचे प्रकार देखील सादर करण्यात आले.यावेळी ईश्वरटी पाटील सरांनी सहभागी झालेल्या साधकांना योगा बदल मार्गदर्शन केले.
कोरोना मुक्तीचा उपाय योग हाच पर्याय डॉ.कुंदन फेगडे आपल्या मनोगत व्यक्त करत असताना योगामुळे अनेक व्याधी दूर होत असल्याचे शास्त्राने सिद्ध केले आहे.नियमित योगासने केल्याने मन प्रसन्न व उत्साही राहते.शरीर व मनाची कार्यक्षमता वाढते.अतिरिक्त वजन कमी होते. वजन कमी असल्यास वाढण्यास देखील मदत होते.त्याचप्रमाणे शरीर व मनावर नियंत्रण करणे शक्य होते. व जीवन रोगमुक्त, व्याधीमुक्त,नशामुक्त करण्यासाठी दररोज योगा करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सर्वांनी योगा करावा असे आव्हान डॉ. कुंदन फेगडे यांनी सर्वांना केले
यावेळी भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष नारायण बापू , जळगाव जिल्हा भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष विजय मोरे भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे तालुका सरचिटणीस विलास चौधरी,तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत भाजपा विलास चौधरी,यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश भंगाळे,स्रीरोग तज्ञ डॉ. कुंदन फेगडे,किशोर कुळकर्णी, नरेंद्र नेवे,पी.एस.सोनवणे सर, बेटी बचाव बेटी पढाव संघटनेच्या तालुकाध्यक्ष सौ.वंदना फेगडे, भूषण फेगडे,भाजप यावल शहर युवा मोर्चा अध्यक्ष रितेश बारी, उपाध्यक्ष यावल शहर युवा मोर्चा संजय पाटील,गोपाळ कोळी, एकनाथ पाटील,डॉ.प्रशांत जावळे,सौं रोहिणी फेगडे,सौ.डॉ. जागृती फेगडे सौ.स्नेहल जावळे, आदींची उपस्थिती होती.
शिबिर यशस्वीतेसाठी सागर लोहार,मनोज बारी,विशाल बारी, शुभम देशमुख आदीं भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here