Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»एकनाथ शिंदेंचा गुजरातमध्ये मुक्काम ; महाविकास आघाडी सरकार कोसळणार ?
    मुंबई

    एकनाथ शिंदेंचा गुजरातमध्ये मुक्काम ; महाविकास आघाडी सरकार कोसळणार ?

    SaimatBy SaimatJune 21, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले असून, ते काल संध्याकाळापासून नॉट रिचेबल आहेत. निवडणुकीत शिवसेना आमदारांच्या फुटीमुळे शिंदे हे नाराज असल्याचे कळते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची मुंबईत वर्षांवर बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीला शिंदे हजर राहणार का? हे पाहावे लागणार आहे.

    मिळालेल्या माहितीनूसार, एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना देखील उधाण आले आहे. सोमवारी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे काही आमदार फुटले असून, भाजपचे सर्व पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर शिवसेनेकडून नाराजी नाट्य सुरू झाले आहे.

    शिंदे नॉटरिचेबल

    एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे काही आमदार देखील गुजरातला आहेत. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतल 13 आमदार असल्याची माहिती आहे. काल संध्याकाळपासून महाविकास आघाडीतील अनेक जण शिंदेंना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ते फोन घेत नाहीये. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवण्यात आले होते. व्युहरचना जेव्हा आखण्यात येत होती तेव्हा शिंदेना साईडलाईन करण्यात आले होते.

    शिवसेनेच्या उमेदवारांना 26 मते

    सोमवारी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार काठावर विजयी आहे झाले आहेत. शिवसेना आणि शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्षांचे मतं फुटल्याचे काल स्पष्ट झाले. शिवसेनेचे उमेदवार आशमा पाडवी आणि सचिन आहिर यांना प्रत्येकी 26 मते मिळाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी वर्षांवर आज बैठक बोलावली आहे.

    या सगळ्या अफवा

    दरम्यान, याप्रकरणी शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, या सगळ्या अफवा आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. नॉट रिचेबलमध्ये काहीच तथ्या नाहीत.

    संजय राऊतांना दिल्ली दौरा रद्द

    शिवसेना खासदार संजय राऊत हे आज दिल्लीला जाणार होते मात्र, एकनाथ शिंदे नाराज असल्याने तसेच आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक असल्याने त्यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला आहे. त्यासोबत मंत्री उदय सामंत यांचा देखील रत्नागिरी दौरा रद्द झाला असून, सामंत आणि राऊत आज मुंबईतच थांबणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railways : एलपीजी टंचाईने रेल्वे खानपान सेवा धास्तावली

    March 11, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.