परीक्षेत गुण महत्व नसून भविष्यात तुम्ही कितपत गुणवत्ता सिद्ध करता ते महत्त्वाचे- सिद्धार्थ पाटील

0
19

जामनेर :

इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालय तर्फे इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, प्रमुख मार्गदर्शक सिद्धार्थ पाटील यांनी विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा बद्दल माहिती दिली तसेच आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अभ्यास , चिकाटी ध्येय हे महत्त्वाचे असून केवळ दहावी परीक्षा उत्तीर्ण किती मार्कस्‌ मिळवले हे महत्त्वाचे नसून ती गुणवत्ता सिद्ध करणे हेच महत्त्वाचे आहे असे उदगार या प्रसंगी केले.

कार्यक्रम प्रसंगी इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुल संस्थेचे सचिव किशोर महाजन यांनी- महाविद्यालयीन शिक्षण कुठून व कसे घ्यावे व ते किती महत्त्वाचे या बद्दल माहिती व पालकांचे शंकेचे निरसन केले. संचालक फकिरा धनगर, संचालक तथा माजी मुख्याध्यापक के.व्ही.महाजन, मुख्याध्यापक सुनिल चव्हाण, पर्यवेक्षक पी.पी.चौधरी इ. मान्यवराची उपस्थित होती.

मार्गदर्शन मेळाव्याचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा जे पी पाटील केले तर 11 वी विज्ञान शाखेसाठी निवड व करिअर कसे करावे या विषयी मार्गदर्शन प्रा.हर्षा दहीलेकर यांनी केले , कला शाखा निवड करिअर व पोलीस भरती ,स्पर्धा परीक्षा याबाबत मार्गदर्शन पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे, करिअरविषयी मार्गदर्शन पर्यवेक्षक प्रा.के.एन.मराठे यांनी केले तर इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, व विज्ञान या शाखेसाठी अभ्यास विषयी उपक्रम, सुखसोयी मार्गदर्शन बद्दल माहिती प्रा.के.डी.निमगडे यांनी दिली.
मार्गदर्शन मेळावा जामनेर तालुक्यातील जामनेर, हिवरखेडा, बेटावद, सामरोद, कुऱ्हापानाचे, नाचणखेडा, गारखेडा, ग्रामीण इ.गावातून 154 विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सविता महाजन तर आभारप्रदर्शन प्रा दिनेश महाजन यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.डी.झेड.गायकवाड, प्रा.संजय क्षीरसागर, प्रा.आर आर पाटील, प्रा.संदीप राजपूत, प्रा.सुमित काबरा, प्रा.सोनूसिंग पाटील, प्रा.रवींद्र शेले, प्रा. विजय पाटील, प्रा. विजेता परदेशी, प्रा.माधुरी महाजन, प्रा.वैशाली पाटील, प्रा.रचना वंजारी,प्रा राजश्री पाटील, प्रा.कोमल सिंग परिहार, प्रा.सचिन गडाख, प्रा.राजेश खडके, प्रा कांचन पाटील, प्रा.मनीषा घडेकर, प्रा.माधुरी तायडे, प्रा. उज्वला सावळे, प्रा जे आर पाटील, प्रा.विजय खाटीक, प्रा. दिनेश न्हावकर, प्रा.समीर घोडेस्वार (क्रीडा शिक्षक) व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here