Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»इंजिनियरिंगच्या विद्यार्थिनीचा हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह!
    क्राईम

    इंजिनियरिंगच्या विद्यार्थिनीचा हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह!

    saimat teamBy saimat teamJune 16, 2022Updated:June 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नंदूरबार    प्रतिनिधी 

    इंजिनियरींगच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या तरूणीचा वसतीगृहात मृतदेह आढळला आला आहे. तरुणीने गळपास घेत आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, वसतिगृहात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    दोंडाईचा येथील बस स्थानकाजवळील मुख्य रस्त्यावरील शासकीय वस्तीगृहातील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेची बातमी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. वैशाली तापेदास गावित वय १९ असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. वैशाली इंजिनियरींगच्या पहिल्या वर्षी पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये शिकत होती.

    वैशालीने हे टोकाचं पाऊल का उचलल हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. वैशालीचा बुधावरी गणिताचा पेपर होता आणि पेपर देऊन आल्यानंतर वैशालीच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा ताण तणाव दिसून आला नसल्याचे तिच्या मैत्रिणींनी सांगितले. पेपर देऊन आल्यानंतर मैत्रिणींसोबत वैशालीने खेळीमेळीच्या वातावरणात जेवण देखील केले. त्यानंतर वैशाली आपल्या रूम मध्ये कधी गेली हे तिच्या मैत्रिणींना कळालेच नाही.रात्री वैशालीच्या रूमचा दरवाजा बराच वेळ आतमधून बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने वस्तीगृह प्रशासनाला वैशालीच्या रूमचा दरवाजा आत मधून बंद असल्याचे सांगितले. तिला आवाज देऊनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद वैशालीचा रूम मधून येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अथक प्रयत्नांनंतर दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा समोरच पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत वैशालीचा मृतदेह आढळून आला. यासंदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.