Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ रनर्सचा आरोग्याचा जागर
    भुसावळ

    जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ रनर्सचा आरोग्याचा जागर

    saimat teamBy saimat teamMarch 9, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी
    जागतिक महिला दिनानिमित्त सोमवार दिनांक ८मार्च रोजी भुसावळ स्पोटर्स अँड रनर्स असोसिएशनच्या लेडीज विंगतर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
    त्यानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात काही महिला सदस्यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून धावायला सुरुवात करून आरपीडी रोडवरील ऑर्डनन्स फॅक्टरी गेट व तेथून पुन्हा मैदानावर परत असे अंतर धावून भुसावळ शहरातील तमाम महिला वर्गास आरोग्याचा संदेश दिला. यावर्षी कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या उद्रेकामुळे लेडीज इक्वलिटी रन काही काळासाठी स्थगित करण्यात आल्यामुळे शहरातील महिला वर्गात काहीसे नाराजीचे वातावरण होते. परंतु आजच्या धावण्यामुळे पुन्हा एकदा आरोग्याप्रति उत्साह संचारल्याचे बघावयास मिळाले. विशेष म्हणजे महिला एकट्या न धावता त्यांनी कुटुंबातील सदस्यांना देखील धावण्यासाठी प्रेरित केले. गुलाबी रंगाच्या टी-शर्ट मध्ये धावणार्‍या महिलांना बघून सकाळी फिरायला निघालेले नागरिक त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक करीत होते. त्यांच्या पाठोपाठ हिरव्या टी-शर्टमध्ये कुटुंबातील सदस्यांचा देखील समावेश होता.
    सकाळी पुनम भंगाळे यांनी वॉर्म अप व्यायामाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर धावायला सुरुवात झाली. धावल्यानंतर स्ट्रेचिंग करण्यात आले. विशेष म्हणजे आजच्या वार्मअप, धावणे व स्ट्रेचिंग या तिन्ही प्रकारात महिला धावपटू आघाडीवर होत्या व कुटुंबातील पुरुष सदस्यांनी त्यांचे अनुकरण केले. कुटुंबातील महिलांचे सर्व जबाबदार्‍या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. शिवाय तिची कुठल्यातरी कामासाठी सतत धावपळ असते परंतु ‘ती धावली: परंतु स्वतःच्या आरोग्यासाठी’ अशी पहाट उजाडली अशी प्रतिक्रिया सरोज शुक्ला यांनी दिली.
    धावणे आरोग्यासाठी उत्तम तर आहेच परंतु धावण्यामुळे नियंत्रित वजन, रोगप्रतिकारक शक्तीत वाढ, संतुलित आहार, शांत झोप, पाठीच्या मणक्याचे दुखणे कमी होणे, उत्तम मानसिक स्थिती, तणावरहित जीवन यासारखे असंख्य फायदे आहेत. त्यामुळे शहरातील महिला मोठ्या संख्येने धावायला सुरुवात करीत आहेत असे ममता ठाकूर यांनी सांगितले.
    कोरोना आजाराच्या पार्श्‍वभूमीवर धावण्याआधी व धावल्यानंतर मास्क, शारीरिक अंतर व सँनिटायझर या त्रिसूत्रीचे तंतोतंत पालन केले. परंतु महिलादिनी मैत्रिणींसोबत व कुटुंबासोबत धावण्याचा आनंद अवर्णनीय आहे असे सोनाली वारके म्हणाल्या. या उपक्रमात पूनम भंगाळे, स्वाती फालक, हर्षा लोखंडे, सुवर्णा पाटील, रिया, संजीवनी लाहोटी, सरोज शुक्ला, ममता ठाकूर, सोनाली वारके,डॉ. चारुलता पाटील, अनिता पाटील, प्रिया पाटील या महिला सदस्यांनी सहभाग नोंदविला. परिवारातील महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रवीण फालक, प्रमोद शुक्ला, डॉ. तुषार पाटील, प्रवीण वारके, राजेंद्र ठाकूर, गोविंदा भंगाले, विलास पाटील, हर्षल लोखंडे, ब्रिजेश लाहोटी, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.