Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मनपाला चार वर्षांनी मिळाले शहर अभियंता एम.जी. गिरगावकर आज स्विकारणार पदभार
    जळगाव

    मनपाला चार वर्षांनी मिळाले शहर अभियंता एम.जी. गिरगावकर आज स्विकारणार पदभार

    SaimatBy SaimatJune 16, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या शहर अभियंतापदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम. जी. गिरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी ते पदभार स्वीकारणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे राज्यमंत्री असताना त्यांनी ओएसडी म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

    नवनियुक्त शहर अभियंता गिरगावकर हे मूळचे नांदेड येथील असले तरी गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबईत स्थायिक आहेत. वसई विरार महापालिकेत त्यांची एका वर्षासाठी शहर अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांना मजीप्रा येथील मूळ पदावर पदस्थापना मिळाली होती. दरम्यान, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी शासनाकडे पत्र पाठवून शहर अभियंतापदी शासकीय अधिकारी नियुक्तीची विनंती केली होती. त्यानंतर गिरगावकर यांनी जळगाव येथे नियुक्तीसाठी विनंती केल्यावरून त्यांची जळगाव महापालिकेत शहर अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली.

    मनपा व जि.प.चा अनुभव
    मजीप्रामध्ये 16 वर्षांपासून कार्यकारी अभियंता पदाची जबाबदारी सांभाळलेले गिरगावकर यांनी वसई विरार महापालिकेत नियुक्तीपूर्वी भिवंडी महापालिकेत चार वर्षे, उल्हासनगर महापालिकेत तीन वर्षे जबाबदारी पार पाडली. याशिवाय सोलापूर, उस्मानाबाद व हिंगोली जिल्हा परिषदेत नियुक्ती झाली होती. बी.ई सिव्हिलपर्यंत शिक्षण झालेल्या गिरगावकर यांना मोठ्या महापालिकांत शहर अभियंतापदाच्या कामाचा अनुभव आहे.

    चार वर्षांत तिघांचे शिक्षण बी.ई. सिव्हिल
    गेल्या चार वर्षांत सहा शहर अभियंता होऊन गेले. त्यात शासनाने नियुक्ती केलेले बी.डी. दाभाडे यांची 2018मध्ये बदली झाली होती. ते बी.ई सिव्हिल होते. सुनिल भोळे व डी.एस. खडके यांचे शिक्षणही बी.ई. सिव्हिलपर्यंत होते. विलास सोनवणी व नरेंद्र जावळे यांनी डिप्लोमा तर अरविंद भोसले यांनी डीसीई / एएमआयईपर्यंत शिक्षण घेतले आहे.

    सोळा वर्षांत सहावे शासकीय अधिकारी मिळाल मनपाला
    महापालिकेच्या स्थापनेनंतर 2006 ते 2022 या सोळा वर्षांच्या कालखंडात शासनाने नियुक्त केवळ सहा शहर अभियंता होऊन गेले. यात पी.डी.कुलकर्णी, बी.बी.राजपूत, गजमल ठाकरे, दिलीप थोरात व बी.डी.दाभाडे यांचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    Bhusawal : सुनसगावातील कुत्र्यांच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    March 26, 2026

    Kerosene Distribution : गॅसटंचाईवर उपाय! राज्य सरकारकडून घरगुती ग्राहकांसाठी रॉकेल वाटप सुरू

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.