जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील येथे केंद्रीय जिल्हा परिषद शाळा तसेच संतोषीमातानगर जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्व तयारी मिळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज शाळेत विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल या अंतर्गत शाळा पूर्वतयारी मेळावा केंद्र जिल्हा परिषद शाळा तसेच संतोषीमातानगर जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पहूर शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे हार गुच्छ देऊन तसेच पुस्तके देऊन या सर्व विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतोषीमाता जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्वतयारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कृषी सभापती जळगाव तथा संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष प्रदीप भाऊ लोंढा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जामनेर तालुका शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश दादा पांढरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विद्याताई क्षिरसागर शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रवीण लहासे लक्ष्मीबाई वानखेडे यांच्यासह सदस्य व पालक उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे हार गुच्छ देऊन होत असेच पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्रदीप लोढा यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक दिनेश गाडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा ताई मोरे यांनी मानले याप्रसंगी शाळेतील शिक्षिका चित्रलेखा राजपूत रत्नमाला काथार मनीषा राऊत यांच्यासह पालक व विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र जिल्हा परिषद मराठी शाळा शाळा पूर्वतयारी मेळावा निमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी रामेश्वर पाटील शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे एडवोकेट एस आर पाटील माजी उपसरपंच रवींद्र मोरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भैय्या मोरे मुख्याध्यापक रवींद्र खोडपे शिक्षक गणेश राऊत मिलिंद लोखंडे स्वप्नील महाजन अंगणवाडी सेविका सुष्मा चव्हाण विद्या कुमावत यांच्यासह पालक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.