नाशिक प्रतिनिधी
धावपळीची जीवनशैली, वाढत्या जबाबदाऱ्या आणि ताणतणावामुळे बहुतांश व्यक्ती स्वतःच्या आरोग्याकडे,व्यक्तिमत्त्वाकडे दुर्लक्ष करतात.स्वतःची अशी एक स्पेस असते हेदेखील विसरून जातात. जीवनाच्या एका टप्प्यावर याची जाणीव होते आणि आपण काही गोष्टी गमावल्याची भावना मनात तयार होते.विशेषकरून महिलांच्या बाबतीत ही गोष्ट अधिक प्रमाणात घडते. घरातल्या जबाबदाऱ्या,कुटुंबाची देखभाल,नोकरीतले ताणतणाव आदी गोष्टींमुळे महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात.परंतु,ही गोष्ट भविष्यात महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकते,असे प्रतिपादन फिटनेस तज्ञ सई संघई यांनी व्यक्त केले.
स्वतःकडे दुर्लक्ष झाल्यानं भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी काही उपाय करता येणं शक्य आहे. महिलांनी स्वतःवर प्रेम करण्यासाठी नेमकं काय करावं,यासंदर्भातील घे भरारी आनंदी सखी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सई संघई बोलत होत्या.
दि १० जून,शुक्रवार विवेकानंद गार्डन हॉल,पाइपलाइन रोड नाशिक या ठिकाणी महिलांचे आरोग्य या विषयावर सई संघई यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी घे भरारीआनंदी सखी ग्रुपच्या अध्यक्षा सुनिता हळकट्टी,उपाध्यक्षा शोभा मोरे,खजिनदार प्रतिभा बछाव,
सुचेता भांबर ,सोनाली नाईक ,स्नेहलता आलीकट्टे ,संतोषी अग्रवाल,सीमा पछाडे,अदिती अग्रवाल,प्रभा तालीकोट,दीपाली कांगणे,अमृता ठकार आदी सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.