चंदीगड : वृत्तसंस्था
देशात पुन्हा एकदा घातपात घडविण्याचा कट आखण्यात आला होता मात्र हा कट सुरक्षा यंत्रणा आणि रेल्वे पोलिसांनी उधळून लावला आहे. पंजाबमध्ये रेल्वे पटरी उखडून टाकणाऱ्यांचा कट फसला. एकाच रात्री पटरीच्या 1200 क्लिप गायब करुन अपघात घडवण्याचा प्लान होता परंतु सुरक्षा यंत्रणांकडून मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. पटियालाच्या प्लांटमध्ये कोळसा पुरवठा करणाऱ्या रेल्वेची पटरी उखडण्याची योजना होती.
जेणे करुन कोळसा विद्युत प्रकल्पाला पोहोचू नये म्हणून हा सगळा कट आणख्यात आला होता.जर पटरी उखडून टाकली असती तर प्लांटला वेळेत कोळसा मिळाला नसता आणि मोठ्या प्रमाणात वीजेची टंचाई झाली असती पण, सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मोठा कट उधळला गेला आहे. हा कारनामा कुणाचा आहे…? याचा तपास आता सुरक्षा यंत्रणा करत आहे.
शनिवारी सराय बंजारा आणि राजपुरा औष्णिक वीज प्रकल्पादरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवरून किमान 1200 क्लिपिंग काढून पंजाबचा वीजपुरवठा अस्थिर करण्याचा गंभीर प्रयत्न करण्यात आला. आज सकाळी कोळसा वाहून नेणारे दोन रेक रुळावरून जात असताना सुदैवाने कोणताही अनुचित अपघात झाला नाही. ज्या दिवशी शिख्स फॉर जस्टिसने रेल रोको पुकारला होता त्यादिवशी हे करण्यात आले आहे. औष्णिक प्रकल्पात कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रॅकवर हा दुसरा प्रयत्न आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 60 क्लिपिंग्ज काढण्यात आल्या होत्या.