Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»सुप्रिया, अजित की रोहित… पवारांमधला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नेमका कोण?
    राजकीय

    सुप्रिया, अजित की रोहित… पवारांमधला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नेमका कोण?

    SaimatBy SaimatJune 3, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवार यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे  पुजाअर्चा व अभिषेक करत आहेत. नातू आ. रोहित पवार  हे देखील मोठ-मोठ्या लोकांवर वक्तव्य करुन पुढे येत आहेत. तर पवारांचे पुतणे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मुख्यमंत्री होण्याच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे, सुप्रिया, अजित की रोहित… यापैकी पवारांमधला मुख्यमंत्री पदाचा नेमका उमेदवार कोण? हे पवारांनी घरच्या घरी ठरवून घ्यावे, असा टोला भाजप नेते प्रविण दरेकरांनी पवार कुटुंबीयांना लगावला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

    रोहित पवारांना दरेकरांचा खोचक सल्ला
    आ. रोहित पवारांनी नुकतीच आमदार बनून राजकारणाची इनिंग सुरु केली आहे. आपली उंची काय आपण बोलतोय काय याच भान रोहित पवारांनी ठेवाव. अजित पवार नेहमी सांगतात वाद-विवाद करु नका त्यापेक्षा लोकांचे कामं करा. त्यामुळे तुम्ही देखील तसे काही करु नका. गोपीनाथ मुंडे आता हयात नाही. त्यांच्या संदर्भात वक्तव्य करुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही तुमच्या घरातली काळजी घ्या, असा खोचक सल्लाही प्रविण दरेकरांनी रोहित पवारांना दिला. रोहित पवारांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर खोचक वक्तव्य केले होते. त्यावर प्रवीण दरेकर बोलत होते.

     

    राऊतांनी तोंड सांभांळून नीट बोलावे
    एक आमदार किमान तीन लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतात. आमदारांना घोड़ेबाजारात उभं करणे हा आमदारांचा अपमान आहे. आमदार काही बाजारातली विकाऊ वस्तु नाही. आमदारांचा स्वाभिमान दुखावला तर संजय राऊत यांच्या ऐवजी संजय पवार  यांना आमदार निवडून देतील. त्यामुळे संजय राऊतांनी तोंड सांभांळून नीट बोलावे. ते त्यांच्या फायद्याचे राहील, असेही दरेकर पत्रकार परिषदेत म्हणाले.

    चुकतो त्यालाच ईडीची भीती
    ईडी-ईडी म्हणताना तुम्ही धुतल्या तांदळाचे आहात का? क्राईम ब्रांच,अॅन्टी करप्शन यांना तुम्ही कुलूप लावून ठेवल काय ? ईडी सारख्या कोणत्याही यंत्रणांना आम्ही दोष देत नाही. ज्यांचे कृत्य ईडी चौकशी होण्यासारख असेल तर त्यांना भीती वाटणं साहजिक आहे. ईडीची भीती सर्वसामान्य आमदारांना वाटत नाही. हे आमदारांना योग्य पद्धतीने कळते. तुमचा आत्मविश्वास हरवला असेल तर दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही, असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.