माऊंट आबू येथे पत्रकार आणि मीडिया प्रतिनिधींसाठी राष्ट्रीय संमेलन

0
31

जळगाव ः प्रतिनिधी

राजयोग शोध आणि प्रतिष्ठानच्या मीडिया विंग तर्फे 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2022 रोजी ब्रह्माकुमारीज्‌ मुख्यालय माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. समाधान आधारित पत्रकारितेने समृद्ध भारत या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील.त्यात वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, सायबर मीडियातील घटक, दूरसंचार आणि पोस्ट विभाग, मीडिया शिक्षण संस्था आदि क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होतील.
संमेलनात सहभागासाठी डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र माध्यम समन्वयक, मीडिया प्रभाग यांच्याशी 9850693705 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू
अप्रतिम निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या माऊंट आबूकडे जगातील नैसर्गिक आणि आध्यात्मिक उर्जेचे शक्तिपीठ म्हणून पाहिले जाते. सुंदर तलाव, धबधबे, बगीचे, डोंगर-दऱ्या, नेत्रदीपक सुर्यास्त आदि नैसर्गिक पर्यटन स्थळाबरोबर स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय देलवाडा, अचलगढ,गुरुशिखर, आबू अंबाजी, पीसपार्क, ज्ञानसरोवर, पांडवभवन,शांतीवन, ग्लोबल हॉस्पिटल आदि विविध विशाल आध्यात्मिक शक्तिस्थाने सुद्धा आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here