जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षामार्फत विद्यापीठाच्या विविध प्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी “करिअर ॲव्हेन्यू इन सायबर सिक्युरिटीज” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत जळगाव येथील सायबर क्षेत्रातील तज्ज्ञ पार्थ जामोदकर यांनी दैनंदिन जीवनात तंत्रज्ञान अधिक गुंतलेले असल्याने कुशल सायबर सुरक्षा व्यावसायिकांची गरज वाढत आहे. सायबर सुरक्षा हे चांगले करिअर क्षेत्र होऊ शकते असे मत व्यक्त केले. सायबर सुरक्षा म्हणजे काय, सायबर धोक्यांचे प्रकार, सायबर सुरक्षेचे फायदे याची माहिती दिली. तसेच व्हाईट हॅट व ब्लॅक हॅट यातील फरक ओळखणे, हॅकर्स व सायबर क्राईम याबाबतही माहिती देऊन विविध उदाहरणे त्यांनी दिली.
यावेळी अध्यक्षस्थानी संगणकशास्त्र प्रशाळेचे डॉ.राम भावसार अध्यक्षस्थानी होते. तर डॉ.सोमनाथ वडनेरे हे उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्लेसमेंट ऑफीसर सोनाली दायमा यांनी केले. कार्यशाळेत ५० विद्यार्थी उपस्थित होते.