शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना

0
32

जळगाव ः प्रतिनिधी
कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे गेल्या वर्षी पहिली ते आठवीतील शालेय विद्यार्थ्यांना एकच गणवेश मिळाला, तोही उशिराने. यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी दोन गणवेश देण्याचे नियोजन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे. जिल्ह्यातील 1 लाख 54 हजार 744 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी 9 कोटी 28 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

राज्य शिक्षण विभागाकडून निधी प्राप्त होताच, त्याचे शालेय समितीकडे त्याचे वितरण केले जाणार आहे.राज्य सरकारकडून गणवेशाचा निधी जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात येणार आहे. निधी प्राप्त होताच तो निधी तालुकास्तरावरून संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला पाठवला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here