जळगाव ः प्रतिनिधी
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साहित्य प्रतिभेला वाव देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये साहित्य लेखनाचे आणि सादरीकरणाचे कौशल्य विकसित व्हावे म्हणून गेल्या 25 वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी विद्यार्थी परिषदेतर्फे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन प्रतिभा संगम आयोजित करण्यात येत असते. यंदा पुणे येथे 17 व 18 मे रोजी झालेल्या 19 व्या प्रतिभा संगममध्ये मू.जे. महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत विजयाची परंपरा कायम राखली आहे.
विजयी विद्यार्थ्यांना प्रसिद्ध मराठी अभिनेते व दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले. राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनात मू. जे. महाविद्यालयातील 11 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या सोबत प्रा. विजय लोहार यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.