जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शेतकरी व महिला या दोन्ही घटकांना स्वयंपुर्ण करणे व त्या क्षेत्रांना चालना देण्यासाठी विविध शासकीय विभाग, महाराष्ट्र राज्य नविन्यता व नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प यांच्या समन्वयातून आज नियोजन भवनात कृषि व महिला उद्योजकता – नाविन्यता परिषद घेण्यात आली.या परिषदेला खा.उन्मेषदादा पाटील यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी पूरक उद्योगात महिलांना उभारी देण्यासाठी तसेच प्रोत्साहीत करण्यासाठी शासनाबरोबरच सामाजिक संस्थांनी व व्यक्तींनी पुढे आले पाहिजे असा सूर उमटला.
यावेळी जळगाव जिल्ह्यातील खासदार, आमदार , विविध बंॅकेचे प्रतिनिधी आणि विविध विभागाचे कार्यालय प्रमुख अधिकारी व विविध योजनांचे लाभार्थी यांची विशेष उपस्थिती होती त्यात आ. राजूमामा भोळे,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह कृषि व उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या परीषदेमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीतील महिला सदस्य,प्रकल्पात समाविष्ट गांवातील शेतकरी महिला गट आणि एम.एस.आर.एल.एम अंतर्गत समाविष्ट महिला गट यांच्याकरीता कृषी आधारीत उद्योग उभारणी करीता मार्गदर्शनपर करण्यात आले.