Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»शहरातील आदर्श नगरात माथेफिरुंनी जाळली नऊ वाहने
    क्राईम

    शहरातील आदर्श नगरात माथेफिरुंनी जाळली नऊ वाहने

    SaimatBy SaimatMay 13, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी

    येथील आदर्श नगरात पाहटेच्या सुमारास तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये घरासमोरील नऊ वाहने अज्ञातांनी जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

    याबाबतची माहिती अशी की,शहरातील आदर्श नगर प्लॉट क्रमांक 186 आराध्या अपार्टमेंट डी मार्टच्या मागील बाजूस व बाजूच्या घरांच्या कंपाऊंडमधील ठेवलेल्या वाहनांना अज्ञातांनी आग लावली. याबाबत अशोक राणे यांनी फोनद्वारे अग्निशमन दलास माहिती दिली. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी गेले असता नागरिकांनी परस्पर आग विझवली होती.या आगीत सेन्ट्रो एमएच 19 एपी 1345 व क्रेटा एमएच 19 सीव्ही 9440 व इतर दोन मोटर सायकलींना आग लावण्यात आली होती.

    दरम्यान, आदर्श नगरातील सृष्टी अपार्टमेंटमध्ये देखील वाहनांना आग लावण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत पूजा पंजाबी यांनी अग्निशमन दलास कळविले होते. यात सृष्टी अपार्टमेंटमध्ये एक मोटर सायकल व एसडी हाईट्समध्ये एक चारचाकी व तीन मोटरसायकल जाळण्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यात एमएच 19 के 4236 क्रेटा व तीन दोन चाकी वाहनांचा समावेश आहे. यात आदर्श नगर परिसरात एकूण 6 दुचाकी व 3 कार जळून खाक करण्यात आल्या आहेत.अग्निशमन दलाचे वाहन चालक विक्रांत घोडेस्वार,वाहन चालक नंदकिशोर खडके, वाहन चालक वसंत दांडेकर, फायरमन भगवान जाधव, रवि बोरसे यांनी आग विझवल्याचे वृत्त
    आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jagnade Maharaj : जगनाडे महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव, बालकांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी

    December 21, 2025

    Parola : अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ता सुरक्षा जागृती मोहीम

    December 21, 2025

    healthy life : सातत्य, सकारात्मक विचार, सजगता निरोगी जीवनाचे गमक

    December 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.