Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»ट्रकचा अपघात ; मालकासह चार मजूर ठार
    क्राईम

    ट्रकचा अपघात ; मालकासह चार मजूर ठार

    SaimatBy SaimatMay 13, 2022Updated:May 13, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी
    बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दुध टाकत असतांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने हे टँकर्स व क्रेनला धडक दिल्याने मालकासह ४ मजूर जागीच ठार झाले आहे. या अपघातासंदर्भांत पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्याशी साईमत प्रतिनिधी यांनी संपर्क साधून सांगतिले असता. त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
    सविस्तर माहिती अशी की, धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. हि घटना घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर काल रात्री यामुळे टँकरच्या मालकाने दुसरा टँकर बोलावून यात दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली. यानुसार दुध हलविण्याचे काम सुरू असतांना समोरून भरधाव वेगाने आलेल्या टाईल्सने भरलेल्या ट्रकने दोन्ही टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
    पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. ट्रकने धडक दिल्यानंतर ट्रकच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पुढील एका ढाब्यावरून त्याला ताब्यात घेतले. त्याचा जबाब घेऊन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हे मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. सर्व मयत हे धुळे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घोडसगाव येथील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon / Wakdi : महसूल पथकाला पाहताच ट्रॅक्टर चालक घेवून पसार वाळूमाफियाचा कारनामा 

    February 17, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.