Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार! : संभाजीराजेंनी केली घोषणा
    राजकीय

    ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार! : संभाजीराजेंनी केली घोषणा

    SaimatBy SaimatMay 12, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे यांचा सहा वर्षांच्या कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी आज आपल्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा केली. आपण राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असून ‘स्वराज्य’ नावाच्या संघटनेची स्थापन करणार असल्याच्या दोन मोठ्या घोषणा संभाजीराजे यांनी केल्या. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची माहिती दिली.

    राजकारण विरहीत, समाजाला दिशा देताना मी कधीही त्याचा फायदा कुणाला होईल हे न पाहाता समाजाचे हित बघितले. त्यामुळे माझा अधिकार बनतो की आपण अपक्ष म्हणून मला पाठिंबा देणे गरजेचे आहे.समाजाला दिशा देण्यासाठी आणि समजाच्या हितासाठीच मी आजवर भूमिका घेत आलो आहे. सहा वर्षात मी कुठेही राष्ट्रपती नियुक्त खासदाराची प्रतिष्ठा धुळीस मिळेल, असे वर्तन केले नाही. जनसेवा करायची असेल तर राजसत्ता देखील तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे जुलैमध्ये राज्यसभेच्या ६ जागा रिक्त होत आहेत. यात मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, अशी घोषणा संभाजीराजे यांनी यावेळी केली. त्यांनी यावेळी सर्वपक्षीय नेत्यांना पाठिंबा देण्याचे आवाहनही केले.

    महाराष्ट्राच्या जनतेने छत्रपती घराण्याला आजवर खूप प्रेम केले. सत्तेत राहून मी अनेक कामे करू शकलो. समाजहित ज्यात असेल त्याची बाजू मी घेत आलो आहे. महाविकास आघाडी असो किंवा भाजपा असो. ज्यावेळी जिथे मला समाजहित दिसले तिथे मी बाजू मांडत आलो आहे. त्यामुळे माझे सर्व पक्षीय नेत्यांना आवाहन आहे की त्यांनी मला पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्यासाठी सहकार्य करावे. मला विश्वास आहे की छत्रपतींच्या घराण्यातील एकमेव माणूस म्हणून मी समाजहितासाठी कामं करतोय. मी आजपासून कुठल्याही पक्षात नाही. मी अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, असे संभाजीराजे यांनी यावेळी जाहीर केले.

    मला वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे लोक पाठिंबा देतात. ही छत्रपती घराण्याची ताकद आहे. मला चांगले-वाईट अनुभव देखील आले. या जनतेला एका छताखाली कशाप्रकारे आणता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहिला आहे. लोकांना संघटीत करण्यासाठी, समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी आणि गोरगरीबांचे कल्याणासाठी मी एक संघटना स्थापन करत आहे. या संघटनेचं नाव ‘स्वराज्य’ असे आहे. या महिन्यातच लोकांची भावना समजून घेण्यासाठी राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.