जळगाव ः प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब जळगाव, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट, प्रभाकर पाटील हॉस्पिटल आणि पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया तसेच पापणी पडणे याविषयी तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंत मुक्तांगण येथील प्रभाकर पाटील हॉस्पिटल येथे 22, 23 व 24 एप्रिल रोजी झालेल्या शिविरात 55 डोळ्यांवर व 5 पापणी पडणे या विषयी मोफत शस्त्रक्रीया करण्यात आल्या. समारोप प्रसंगी आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. दिपक आठवले, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे, जळगाव पिपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, रोटरीचे अध्यक्ष संदीप शर्मा, मानद सचिव मनोज जोशी, प्रकल्प प्रमुख डॉ. तुषार फिरके, माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. आठवले, प्रकाश चौबे व डॉ. मधुसुदन झवर यांनी मनोगत व्यक्त केले.
शिबिरासाठी पुणे येथून डॉ.मधुसुदन झंवर, डॉ.राजेश पवार, डॉ. वैभव वनारसे, डॉ. सचिन गाडे, डॉ. अमर शहा, डॉ. ललित शहा, डॉ. सुनिल भुजबळ, डॉ. आनंद खडके, डॉ. उदय कुर्डुकर, डॉ. अनिल वायकुडे, डॉ.अमोल वालझडे, डॉ. मयुर लांडे, डॉ. मनोज मायगुडे, डॉ. शामकांत कुळकर्णी, डॉ. गणेश बांदल, डॉ. गणेश भारुडे, तसेच नाशिक येथील डॉ. श्रद्धा शिरसाट, डॉ. प्रियंका दुधाट, डॉ. स्नेहल कवटकर, डॉ. अर्जुन काटकर आदि तज्ज्ञ डॉक्टरांनी या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या. रोटरी क्लब जळगावचे हे पाचवे शिबीर तर पुणे नेत्रसेवाचे 177 वे शिबीर होते. लाभार्थी रुग्णांपैकी सुनील महाजन (एरंडोल) व बापू पाटील (नांद्रा) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक व सूत्रसंचलन डॉ. तुषार फिरके यांनी तर आभार कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी मानले.
यशस्वीतेसाठी रोटरीचे डॉ. हेमंत बाविस्कर, जितेंद्र ढाके, डॉ. काजल फिरके, राजेश वेद, शाम अग्रवाल, राकेश चव्हाण, किशोर तलरेजा, डॉ. सुनील सुर्यवंशी, रितेश जैन, योगेश गांधी, कंवरलाल संघवी यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.