लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी विष्णू मोरे

0
30

जळगाव : प्रतिनिधी
राज्यभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा उपाध्यपदी विष्णू गोकुळ मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले, राज्य उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी ही नियुक्ती केली असून यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र विष्णू मोरे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
विष्णू मोरे हे गेल्या काही वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत उत्तर महाराष्ट्रचे विभागीय अध्यक्ष दीपक वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक सावळे, धरणगाव तालुकाध्यक्ष महेंद्र चौधरी यांच्या शिफारशीने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
मोरे यांच्या निवडीबद्दल लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले, राज्य उपाध्यक्ष अमोल पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्ष दशरथ सुरडकर, औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष प्रविण तायडे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here