जळगाव ः प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षेच्या शेवटच्या दिवशी 645 विद्यार्थ्यांपैकी 396 विद्यार्थ्यांनी पेटची ऑनलाईन परीक्षा दिली. पाच दिवसात एकूण 2312 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
दिनांक 18 ते 22 एप्रिल पर्यंत विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा केंद्रात या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. एकुण 3 हजार 688 विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यासर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जात असून त्यासाठी 250 संगणकांची व्यवस्था करण्यात आली होती. एका दिवसात 4 बॅचेसमध्ये या परीक्षा झाल्या. शेवटच्या दिवशी चार बॅचेससाठी 645 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी 396 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. पाचव्या दिवशी इंग्रजी, राज्यशास्त्र, समाज कार्य, इतिहास, संरक्षणशास्त्र आणि तत्त्वज्ञान या सहा विषयांच्या परीक्षा घेण्यात आल्या.
18 ते 22 एप्रिल दरम्यान झालेल्या या परीक्षेत 2312 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 1376 अनुपस्थित राहिले. पाच दिवसांचे उपस्थितीचे हे प्रमाण एकूण 62.71 टक्के एवढे राहिले.केंद्रप्रमुख म्हणून प्रा. पी.पी.माहुलीकर हे काम पहात असून मुख्य समन्वयक प्रा.समीर नारखेडे तर समन्वयक डॉ.मनोज पाटील आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून उप कुलसचिव व्ही.व्ही. तळेले आणि तांत्रिक अधिकारी म्हणून दाऊदी हुसेन यांनी काम पाहिले.
