Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचा प्रारंभ
    जळगाव

    जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचा प्रारंभ

    saimat teamBy saimat teamFebruary 17, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, शारिरीक आंतर पाळणे या त्रिसुत्रीचा वापर प्रभावीपणे करत रहाणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत लसीकरणाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ जिल्ह्यात प्रभावी कामगिरी बजावेल. कोरोना लस ही सुरक्षित असून कोणीही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणाच्या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
    माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, जळगाव यांच्या उपक्रमांतर्गत कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल आणि अमळनेर आदि तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
    याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोदे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो अमरावतीचे अंबादास यादव, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, नेहरू युवा केंद्राचे नरेंद्र डांगर, सेवानिवृत्त प्रचार अधिकारी उल्हास कोल्हे उपस्थित होते.
    जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पुढे म्हणाले की, लसीकरणाबाबत पारंपारिक कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.यामुळे पारंपारिक कला जोपासणार्‍या कलाकारांना व त्यांच्या कलागुणांना समाजासमोर सादर करण्यासाठी या मोबाईल चित्ररथामुळे संधी मिळेल.
    माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे.
    या उपक्रमांतर्गत लसीकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे हा या मागील उद्देश आहे.लसीकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे,आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे.
    यावेळी दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशिय संस्थेचे विनोद ढगे आणि त्यांच्या कलापथकातील कलाकारांकडून स्थानीय बोली भाषेच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे सहकार्य लाभले आहे.या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी बापू पाटील, किरणकुमार आणि दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशिय संस्थेचे विनोद ढगे आणि त्यांच्या चमुचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.