जळगांव प्रतिनिधी
नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा ‘गिरणा गौरव’ पुरस्कार अत्यंत थाटात जलपुरुष राजेंद्रसिंग यांच्या हस्ते शंभु पाटील यांना प्रदान करण्यात आला .
कवी कालिदास नाट्यगृहात हा सोहळा पार पडला या वेळी अध्यक्षस्थानी रामदास फुटाणे , जलपुरूश राजेंद्रसिंग , पालकमंत्री छगन भुजबळ , गिरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार , व इतर मान्यवर उपस्थित होते .
नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार शंभु पाटील यांना प्रदान करण्यात आला . गिरणा गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिला जातो . या वर्षांपासून तो नाट्यक्षेत्रातील रंगकर्मीना द्यायची सुरवात शंभु पाटील यांच्या पासून करण्यात आली. कालच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला . गिरणा काठावर कुवारखेडा गावच्या रंगकर्मीला मिळालेल्या या “गिरणा पुरस्कारा”च मोल मला अधिक आहे . ज्या नदीच्या पाण्यावर माझं भरण पोषण झालं त्या नदीच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला याच श्रेय परिवर्तन जळगाव परिवाराला आहे . परिवर्तनने केलेले सृजनशील उपक्रम या मुळेच माझा सन्मान झाला आहे . अश्या भावना शंभु पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या .
या प्रसंगी कवी राजू देसले , कवी प्रकाश होळकर , विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . यापूर्वी हा पुरस्कार डॉ भालचंद्र नेमाडे , सिंधुताई सपकाळ , मा. भवरलाल भाऊ जैन , डॉ मोहन आगाशे , ऍड उज्वल निकम , रतनलाल .सी. बाफना , लेखक रंगनाथ पठारे सर , आदि मान्यवरांना या पूर्वी हा पुरस्कार देण्यात आला आहे .
काल झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी पालकमंत्री छगन भुजबळ , राजन गवस , गुरू ठाकूर , नीलिमा मिश्रा या मान्यवरना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.