Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»‘प्रियतमा’ आणि ‘गंध दरवळला’ मराठी गाणे खान्देशातील रसिक प्रेक्षकांच्या भेटीला !
    जळगाव

    ‘प्रियतमा’ आणि ‘गंध दरवळला’ मराठी गाणे खान्देशातील रसिक प्रेक्षकांच्या भेटीला !

    saimat teamBy saimat teamFebruary 12, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    जळगावातील किंग प्रोडक्शन या गाणे निर्मिती आणि चित्रपट निर्मिती संस्थेने किंग प्रोडक्शन या नावाने यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून नुकतेच पदार्पण करीत असून या पदार्पणानिमित्त ’प्रियतमा ’ आणि ’गंध दरवळला’ या गाण्याचे अल्बम लॉन्चिंग केले जाणार असल्याची माहिती निर्माते नागेश जाधव आणि प्रशांत जाधव यांनी काल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
    यावेळी बोलताना निर्माते नागेश जाधव आणि प्रशांत जाधव म्हणाले की, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना आपल्या उपजत कलागुणांची सादरीकरण करण्याची संधी मिळत असते मात्र त्यांना कुणाच्या तरी सहकार्याची आवश्यकता असल्याने अशा कलाकारांना जगासमोर आणून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या अंगभूत असलेली सुप्त गुण समाजासमोर यावेत आणि त्यांची कलाकृती सार्‍या जगासमोर यावी हा असून यानिर्मिती मागचा हा उद्देश आहे.
    दरम्यान …प्रियतमा… आणि ’गंध दरवळला या मराठी गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण हे जळगाव जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी करण्यात आले असून उत्तम अभिनय , उत्कृष्ट दिग्दर्शन , उत्तम संगीत आणि सहकारी यांच्या सहकार्याने दोन्ही गाण्याचे चित्रीकरण झाले असून या अल्बमला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल अशी खात्री असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली .
    यावेळी दिग्दर्शक आणि गीतकार प्रशांत नर्मदा, देविदास सोनवणे, अभिनेता प्रितीश पाटील, अभिनेत्री आरती गोळीवाले, संगीतकार संदीप डांगे,गायक गोपाळ ठाकरे,गायिका अनुरिता राय, कॅमेरामन आकाश पाटील,नृत्य दिग्दर्शक प्रितीश पाटील,संकलन मुबारक तडवी, कला दिग्दर्शक किरणकुमार अडकमोल आदी उपस्थित होते. या संपूर्ण गाण्यांच्या निर्मितीला प्रोडक्शन मॅनेजर सुरेश राजपूत, तसेच सहकार्य करणार्‍या टीममध्ये प्रियांका वाणी,अमन ,ओम, सुमित, आदित्य, रिया आदींनी परिश्रम घेतले .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.