यावल भुसावळ रस्त्यावर मोठमोठे जिवघेणे खड्डे.

0
28

यावल  (सुरेश पाटील)
यावल-भुसावळ रस्त्यावर अंजाळे गावापासून भुसावळ कडे जाताना बंद पडलेल्या जुन्या पोलीस चौकीपर्यंत रस्त्यावर मोठमोठे जिवघेणे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे याकडे यावल सार्वजनिक बांधकाम उपविभागासह जलसिंचन विभागाचे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्व स्तरातून केला जात आहे.
शेळगाव बॅरेजचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे,अंजाळे गावाजवळ मोर नदीपात्रात शेळगाव बॅरेजचे बॅकवाटर/पाणी सतत राहणार असल्याने या ठिकाणी उंच पुलासह रस्त्याचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे वाहतुकीस पर्यायी रस्ता करण्यात आला आहे,अंजाळे गावापासून भुसावळकडे जाताना रस्त्यावर अर्धा किलोमीटर अंतरावरील उतार आणि चढावावर मोठमोठे जीव घेणे खड्डे पडले आहेत हे खड्डे संबंधित कॉन्ट्रॅक्टर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसून येत नाही का?असा प्रश्न उपस्थित होत असून या रस्त्यावर महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात हरियाणा उत्तर प्रदेश इत्यादी राज्यातील जड वाहनांची व इतर दुसऱ्या वाहनांची मोठी वर्दळ आणि वाहतूक सुरू असते यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, तसेच वाहनधारकांना आपली वाहने चालविणे मुश्कील झाले आहेत याची दखल वरील संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ घेऊन रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी संपूर्ण भुसावळ विभागातून केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here