केंद्रीय पुरस्कृत अनुसूचित जाती आश्रम शाळेतील दहावी परीक्षा बोगस?

0
96

यावल (सुरेश पाटील)

केंद्रीय पुरस्कृत एका अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळेत शैक्षणिक कायद्यांची पायमल्ली करून इयत्ता 10वी परीक्षा बोगस घेतली जात असल्याची तसेच शाळेला मिळालेला सांकेतिक क्र.हा सुद्धा संशयास्पद असल्याने इयत्ता 5वी ते 9वीतील विद्यार्थी हे सुद्धा प्रत्यक्षात नसताना कागदोपत्री दाखवले गेल्याने या शाळेमार्फत शासनासह विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक व शैक्षणिक फसवणूक केली गेली त्यामुळे या गैरप्रकाराकड़े संबंधित सर्व शिक्षण अधिकारी जबाबदार असल्याचे जिल्ह्यात शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रात बोलले जात आहे.
या एका निवासी आश्रम शाळेत कागदोपत्री जे विद्यार्थी मुलं-मुली दाखविले गेले त्यांच्या पटसंख्येनुसार आधार कार्ड नोंदणी संशयास्पद आहे,विद्यार्थी इयत्ता 9वी पर्यंत शाळेत दाखल नसताना ते विद्यार्थी कोणत्या शैक्षणिक नियमानुसार इयत्ता 10 वी परीक्षा देत आहेत? हा शिक्षण अधिकाऱ्यांचा संशोधनाचा आणि चौकशीचा भाग असला तरी ही गंभीरबाब तालुका,जिल्हा स्तरावरील शिक्षण व संबंधित अधिकार्‍यांसह शिक्षण उपसंचालक नाशिक,नाशिक विभागीय सचिव आणि विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या निदर्शनात न येणे म्हणजे शिक्षण विभागात किती भोंगळ आणि बोगस कारभार सुरू आहे हे उघड झाले आहे.
निवासी आश्रम शाळेला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच वस्तीगृहातील नियुक्त कर्मचाऱ्यांची संचमान्यता, बिंदुनामावली रोस्टर यांचे बाबत उपसंचालक यांच्याकडून परवानगी पत्र कसे मिळाले?शाळेत नियुक्त मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर,वसतिगृह कर्मचारी यांची शैक्षणिक अहर्ता पात्रतेनुसार यादी,नाव शैक्षणिक अहर्ता पदनाम,आधार कार्ड नं., मोबा.नं.जातीनिहाय वर्गवारी सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण प्रमाणपत्र,इयत्ता 5 वी ते 11वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे नाव,इयत्ता, जात,पोटजात,आधार कार्ड नं., वर्गनिहाय वर्ग शिक्षकांचे नाव, इयत्ता 10वी मधील नियमित विद्यार्थ्यांचे जाती निहाय इयत्ता 5वी 9वी चे निकालाची प्रत.
नमुना नं.1 रजिस्टरची लिव्हीग सर्टिफिकेटची,इयत्ता 10 वी मधील 17 नंबर फॉर्म/खाजगी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नं. त्यांच्याकडून “फी” जमा केल्याच्या पावत्यांची तसेच इयत्ता 10वी परीक्षेसाठी उपसंचालक यांच्याकडून मिळालेल्या इंडेक्स नंबर,सांकेतिक क्र. हा किती वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी देण्यात आला आहे का? शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दैनिक हजेरी पुस्तक,इयत्ता 5 वी ते 11वी मधील विद्यार्थ्यांचे दैनिक हजेरी पुस्तकाची आणि इयत्ता 5वी ते 11वी पर्यंतच्या वर्गवार दिल्या गेलेल्या वार्षिक निकालांची चौकशी विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी जळगाव,शिक्षण उपसंचालक नाशिक,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाचे विभागीय सचिव यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील शिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास या शाळेतील बोगस,भोंगळ कारभार जनतेसमोर आल्या शिवाय राहणार नाही असे जिल्ह्यात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here