जळगाव : प्रतिनिधी
येथील मेहरुण परिसरातील राम नगरमधील रहिवासी पत्रकार संतोष पितांबर ढिवरे यांचे आज सोमवार दि.८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४५ वाजता मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे.
संतोष ढिवरे यांच्यावर मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते ‘साईमत लाईव्ह’चे जिल्हा प्रतिनिधी होते.