Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»अफजलखानाच्या वधाचा इतिहास मोठ्या पडद्यावर
    राज्य

    अफजलखानाच्या वधाचा इतिहास मोठ्या पडद्यावर

    SaimatBy SaimatMarch 21, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची गाथा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. फर्जंद, फत्तेशिकस्तनंतर दिग्पाल यांच्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची कोणती कथा चित्रपटाच्या रुपात येईल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. शिवजयंतीच्या मुहूर्तावर आता या चौथ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘शेर शिवराज’असं या चित्रपटाचं नाव आहे. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव केला होता. याचीच गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
    बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची गाथा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. फर्जंद, फत्तेशिकस्तनंतर दिग्पाल यांच्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची कोणती कथा चित्रपटाच्या रुपात येईल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली.
    ‘आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह,’ असं लिहित दिग्दर्शक दिग्पाल आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर याने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘शेर शिवराज’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला हे पहायला मिळणार आहे. शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
    जवळपास 45 सेकंदांच्या या टीझरची सुरुवातच अफजलखानापासून होते. मात्र ही भूमिका कोणी साकारली, हे स्पष्ट दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनेता चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा अंगावर काटा उभा करतो. या टीझरने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे. येत्या 22 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.