जळगाव ः प्रतिनिधी
तालुक्यातील नशिराबाद येथील वरची आळीतील रहिवासी सुनिल दगडू महाजन यांची महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या जळगाव ग्रामीण तालुकाध्याक्ष्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली
नुकत्याच जळगाव येथील सहकार बोर्ड जिल्हा बैठकीत महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष शामराव पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली. सुनिल महाजन या आधी नशिराबाद शहर उपाध्यक्षपदी व तालुका युवक अध्यक्षपदावर कार्यरत
असतांना त्यांच्या कामाची गती व सामाजिक बांधिलकी पाहून त्यांना जळगावग्रामीण तालुकाध्याक्षपदाची सर्वानुमते संधी देण्यात आली. यावेळी प्रदेश अध्यक्ष शालिग्राम मालकर, ज्ञानेश्वरभाऊ महाजन, आत्माराम माळी, डॉ.नलिन महाजन, प्रेरणा महाजन,माजी सरपंच विकास पाटील,भीमराव महाजन यांच्यासह एस.बी., आर.एस. ग्रुप सोबत माळी समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.