Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»सत्ताधा-यांच्या बाजूने कल जाताच बाजारात तेजीची लहर
    राज्य

    सत्ताधा-यांच्या बाजूने कल जाताच बाजारात तेजीची लहर

    SaimatBy SaimatMarch 10, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आज पाच राज्यांचे निकालांचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधा-यांच्या बाजूने कल जाताच बाजारात तेजीची लहर पसरली. बाजाराने सुरुवातीच्या सत्रातच उसळी मारली. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 ने व्यापा-याच्या 2 टक्के जास्त आघाडी घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारातील कालच्या काही घडामोडींमुळे बाजाराला मदत मिळाली होती. तर आज देशातील पाच राज्यातील निवडणुकींचे निकाल धडकायला लागताच बाजाराने कूस बदलली. बीएसई सेन्सेक्सने 1100 अंकांची भरारी घेतली, बीएसई सध्या 55,800 अंकाच्या पातळीवर आहे. तर एनएसई निफ्टी 50 ने 500 अंकांची उडी घेतली आहे. हा निर्देशांकाने सध्या 16757 पातळीच्या मोर्चोवर जम बसविला आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे आज निर्देशांकाने नकारात्मक नाही तर सकारात्मक सुरुवात केली आणि अनेक कंपन्यांच्या शेअरची हिरव्या संकेतवर घौडदौड सुरु आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना आज मोठे हायसे वाटले असणार. गुंतवणुकदारांचे आणि जनतेचे देशातील निकालांकडे लक्ष लागले आहे. कारण दिल्लीच्या सत्तेचा राजमार्ग उत्तरेतील राज्यांमधून जातो. भविष्यातील देशाच्या घडामोडींचे अंदाज या निकालातून बांधता येणार आहे.
    अॅक्सीस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, बजाज फिशरीव्ह, एशियन पेटंस्, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स यांनी आज निर्देशांकात कमालीची आघाडी घेतली आहे. हे शेअर घौडदौड करत आहेत. तर निफ्टी मेटलसह इतर विभागातही आनंदाची लहर दिसून येत आहे. या विभागातील अनेक शेअर सकारात्मक दिशेने घौडदौड करत आहे. बँक निफ्टीत ही कमालीची तेजी दिसून आली. बँक निफ्टीत 3.6 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर निफ्टी ऑटो 3.15 टक्क्यांनी वधरला, निफ्टी एफएमसीजीत 2 टक्क्यांची वाढ झाली. तर निफ्टी आयटी इंडेक्समध्ये अर्ध्या टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे.
    आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 28 पैशांनी वधरला. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 76.28 रुपये इतका होता. काल डॉलरची किंमत 76.56 रुपये होती. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने, युएई आणि ईराण तेलाचे उत्पादन वाढवणार असल्यांच्या बातम्यांनी रुपयाला थोडी बळकटी मिळाली आहे. आयसीआयसीआय डिरेक्टच्या मतानुसार, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे रुपया आज मजबूत स्थिती राहील. तर दुसरीकडे डॉलर ही गेल्या काही दिवसांपेक्षा मजबूत स्थिती राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निवडणुकातील निकालांचे परिणाम येत्या काही दिवसात शेअर बाजारावरही दिसून येतील.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.