Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी लस घेऊन केला प्रारंभ
    जळगाव

    जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी लस घेऊन केला प्रारंभ

    saimat teamBy saimat teamFebruary 6, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच जिल्ह्यातील केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी ’फ्रंटलाईन’ योध्दांसाठी आजपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पहिली तर पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दुसर्‍या क्रमांकावर ’कोविशील्ड’ लस घेऊन दुसर्‍या टप्पयाचा प्रांरभ करुन कोरोना लसीकरण सुरक्षित असल्याचा संदेशही दिला.
    कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी ’कोविशील्ड’ ही लस तयार झाली आहे. जिल्ह्यात ही लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात (१६ जानेवारीपासून) आरोग्य सेवकांना लस देण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५४१ आरोग्य सेवकांना लस देण्यात आली आहे. तर शासकीय रुग्णालयात आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत दुसर्‍या टप्प्याचा प्रारंभ करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी त्यांना लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली.
    ओपीडी इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर कोरोना लसीकरण केंद्रात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची संगणकावर नोंद झाल्यावर अधिपरिचारिका गायत्री पवार यांनी लस टोचून ’फ्रंटलाईन वॅरीयर’ च्या लसीकरणाचा प्रारंभ केला. त्यानंतर डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी अनुक्रमे लस घेतली. लस घेतल्यानंतर सर्वांना अर्धा तास निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी, डॉ. हृषीकेश येऊळ, डॉ. प्रदीपकुमार शेट्टी यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.
    यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधाची कोविशील्ड ही लस पूर्णतः सुरक्षित आहे. त्यासाठी आरोग्यासह कोरोनाच्या लढ्यात अग्रभागी असणार्‍या (फ्रंटलाईन) सर्वानी वेळेत लसीकरण करून घ्यावे. डॉ. मुंढे यांनीदेखील कोरोना प्रतिबंधाची लस सुरक्षित असल्याचे सांगत लस घेण्यासाठी प्रत्येक फ्रंटलाईन वॅरियर यांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले.
    यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. यु. बी. तासखेडकर, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, पोलीस उपअधीक्षक (गृह) दिलीप पाटील, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, मोटार परिवहन विभागाचे पो.नि. समीर मोहिते, राखीव पो.नि. संतोष सोनवणे, जिल्हापेठचे पो.नि. विलास शेंडे, शनिपेठचे पो.नि. विठ्ठल ससे, रुग्णालयाचे उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. अनुराधा वानखडे, अधिसेविका कविता नेतकर, पीएसआय भरत चौधरी उपस्थित होते.
    याठिकाणी सार्वजनिक आरोग्य परिचारिका अर्चना धिमते, अधिपरिचारिका जयश्री वानखेडे, गायत्री पवार, कर्मचारी नितीन राठोड, सुरक्षा अधिकारी
    अजय जाधव, डाटा एंट्री ऑपरेटर प्रदीप बावस्कर, इशांत पाटील, बापू पाटील, अभिषेक पवार यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्याचे यशस्वी नियोजन केले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.