जळगाव : प्रतिनिधी
भादली बुद्रूक येथील पुरातन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंदिराची दुरुस्ती करून जीर्णोद्धार केला जाणार आहे.
पंचायत समितीच्या सेस फंडातून सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असून, त्याचेही भूमिपूजन झाले. सरपंच मिलिंद चौधरी, पंचायत समिती सदस्या जागृती चौधरी, उपसरपंच मीराबाई कोळी, गोपाळ ढाके, पोलिस पाटील ॲड. राधिका ढाके, मुरलीधर महाराज
रडे, माजी सरपंच मनोहर महाजन, राजेंद्र चौधरी,
उपसरपंच मीराबाई कोळी, पूजा नारखेडे, संदीप कोळी, मनोज चौधरी आदी उपस्थित होते.