फैजपुर ता.यावल : प्रतिनिधी
येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त दि.27 रोजी फैजपुर येथील सम्राट बुद्ध विहारात उत्सव समिती गठन करण्यासाठी बैठकचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी मध्ये उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी आयु. दिपकभाऊ हिवरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे, उपाध्यक्ष सागर किशोर भालेराव, सचिव देवानंद मेढे, कार्याध्यक्ष शे. जहांगीरभाई, खजिनदार रोहित प्रकाश मेढे, सल्लागार पत्रकार मयुरभाऊ मेढे, तसेच सदस्यपदी उदय तायडे, पवन विजय मेढे, किरण मेढे(बग्गनभाऊ) कुणाल मेढे, चेतन गाढे, आर्यन केदारे, राजु वाघ, चेतन मेढे, चंद्रमनी मेढे, रोहित मेढे, बाळा मेढे, अतुल मेढे, अनिकेत साळुंके, सुमित मेढे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीला उपस्थित यावल ता. युवक कांग्रेसचे सरचिटणीस. आयु.अजय मेढे, भिमपुत्र ग्रुपचे अध्यक्ष पप्पु मेढे, आयु. अनिल मुरलीधर मेढे, फाईट क्लबचे गोल्डनभाऊ मेढे, योगराज मेढे, सामाजिक कार्यकर्ते. कैलास भोजराज मेढे, मुन्ना मेढे, प्रविण मेढे यांची उपस्थिती होती.