धावत्या कारने घेतला पेट, भुसावळचे सहा जण बचावले

0
12

जळगाव :प्रतिनिधी
फर्दापूर येथील बसस्थानकाजवळील पुलावर धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली. चालकाने सावधगिरी बाळगून कारमधील ६ जण खाली उतरल्याने जीवितहानी टळली.
अभिजित नरवडे (रा. गजानन महाराजनगर, भुसावळ) हे भुसावळ येथून कारने (एमएच २० डीजे २१०७) भुसावळवरून औरंगाबादला वडील भारत नरवडे, आई, बहीण, चार वर्षांची भाची व एक नातेवाईक महिला असे एकूण सहा जण मावशीच्या मुलीच्या लग्नाला जात होते. कार फर्दापूरला आल्यावर कारमधून अचानक धूर येत असल्याचे अभिजित नरवडे यांना दिसले. त्यांनी कार बसस्थानकाजवळील पुलावर थांबवली व कारचे बोनेट उघडण्याचा प्रयत्न केला. ते उघडले नाही व आग सुरू झाली. त्यांनी सावधगिरी बाळगत लागलीच कारमधून सर्वांना बाहेर काढले. त्यांनी जवळच असलेल्या भारत पेट्रोल पंपावर जाऊन अग्निरोधक यंत्र आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले व कार खाक झाली. दरम्यान, कारमालकाचे सात लाखांचे नुकसान झाले आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here