यावल : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्या ठिकाणी व मराठीवर प्रभुत्व व मराठीची व्याख्या रुजवणारे मराठी शिक्षक व शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला त्या ठिकाणी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुधा मॅडम खराटे यांना कुसुमाग्रजांची पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला साने गुरुजी शाळेचे मराठी शिक्षक योगेश भारी सर व सरस्वती विद्या मंदिर शाळेचे किरण वाणी सर यांचाही सत्कार करण्यात आला व अनेक वर्षांपासून मराठी पत्रकारिता करीत असलेले तालुक्यातील सर्व मराठी पत्रकार बांधव यांचा इतर ठिकाणी सत्कार करण्यात आला या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर तालुका उपाध्यक्ष श्याम पवार तालुका उपाध्यक्ष अनिल सपकाळे शहर अध्यक्ष किशोर नन्नवरे शहर उपाध्यक्ष अबिद कच्ची गौरव कोळी मनोज महेश्री राहुल पाटील गजेंद्र माळी अजय तायडे कुणाल बारी पंकज हटकर हेमराज चौधरी गजमल भिल राजू शेख आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते