जामनेर : प्रतिनिधी
२७ फेब्रुवारी थोर कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्ताने मनसेतर्फे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील मराठी कलाकार , कवी, नाटककार , पत्रकार , शिक्षक , नृत्यकार यांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील सर्वांचे आकर्षण सावन मा महिना मा चे सिनेस्टार सचिन भाऊ कुमावत , सुप्रसिद्ध गायक पी गणेश, कवी संतोष पाटील , गायक डॉ गिरीश कुलकर्णी , गायक हरी महाजन, गोंधळी संभाजी पाटील , कवी सागर जोशी , कुलकर्णी मॅडम , नृत्यकार राजनंदीनी राठोड , पोलीस निरीक्षक अरुण धनवडे साहेब , पत्रकार राहुल दाभाडे , लोकमत पत्रकार विनोद कोळी , देशदूत वार्ताहर बाळू पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तम थोरात , गोविंद अग्रवाल , नितीन पाटील आदीची मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उपस्थिती होती यावेळी मनसेतर्फे तालुक्यातील सर्व कलाकार व कलावंत यांचा सत्कार करण्यात आला.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसे चे कार्यक्रम आयोजक मनसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ विजयानंद कुलकर्णी , मनसे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ भक्ती कुलकर्णी , मनसे तालुकाध्यक्ष अशोक कृष्णा पाटील , मनविसे तालुका अध्यक्ष किशोर पाटील , मनविसे तालुका उपाध्यक्ष आशुतोष पाटील , तालुका उपाध्यक्ष किरण अहिरे , सागर जोशी , नाना शिंदे , दत्ता पाटील, किरण सौदागर , ह भ प अरूण भोसले , मनविसे ता सचिव वाल्मिक कोळी , जगदीश कुरकुरे , मुकेश कुमावत ,राम भोसले , मनविसे शहर अध्यक्ष मयूर कोळी , अनिल मोरे , हरीश गोतमारे , गोपाल चौधरी ,सचिन जाधव , नाना कोळी , हर्षल पाटील , अजय पाटील , अक्षय तेली , शिवराज देशमुख , जितेंद्र जाधव , ता उपाध्यक्ष विनोद चव्हाण , संभाजी पाटील , चरण दुधे , आशपाक देशमुख, आदी मनसे सैनिकांनी मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी झाला, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी केले