नरेंद्र भोई यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा पुरस्कार

0
88

जळगाव : प्रतिनिधी
काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक नरेंद्र विश्वनाथ भोई यांना विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडागुणांना चालना देण्यासाठी तसेच क्रीडा क्षेत्राच्या प्रचार , प्रसार व प्रगतीसाठी भरीव योगदान दिल्याबद्दल जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नुकतेच जळगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे नरेंद्र भोई यांचा सपत्नीक सत्कार करून हा पुरस्कार देण्यात आला .
नरेंद्र भोई हे जळगाव येथील काशिनाथ पलोड शाळेचे क्रीडा शिक्षक असून आजपर्यंत विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये पंच म्हणून सुद्धा त्यांनी यशस्वीपणे कामगिरी बजावली आहे. पुरस्काराबद्दल शाळेचे प्राचार्य गणेश पाटील , समन्वयिका स्वाती अहिरराव , संगीता तळेले , अनघा सागडे व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर बाधंवानी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here