यावल: प्रतिनीधी
विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेची राज्यस्तरीय बैठक नुकतीच संस्थापक अध्यक्ष नागोजीराव पांचाळ यांच्या आदेशाने व संजय दीक्षित राज्य उपाध्यक्ष विभागीय अध्यक्ष राजेंद्र दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली. यावेळी बैठकीत एक मताने रावेर लोकसभा पूर्व विभाग जिल्हाध्यक्षपदी यावलचे चेतन अढळकर यांची निवड करण्यात आली .
संस्थापक अध्यक्ष नागोजीराव पांचाळ यांच्या आदेशाने व राज्य उपाध्यक्ष संजय दीक्षित विभागीय अध्यक्ष राजेंद्र दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काल सर्व समाज बांधवांच्या एक मताने रावेर लोकसभा पूर्व विभाग जिल्हाध्यक्षपदी यावरचे चेतन अढळकर यांची निवड करण्यात आली
चेतन अढळकर यांची निष्ठावान कर्तव्यदक्ष व जुने कार्यकर्ते म्हणून ओळख आहे . ते हे समाज संघटन करण्यात करण्यासाठी सदैव तत्पर राहतील असा विश्वास समाजबांधवांना असल्याने त्याच्यावर ही जबाबादारी सोपविण्यात आली असल्याचा सूर बैठकीतून निघाला.
प्रसंगी राज्य उपाध्यक्ष संजय दिक्षित , राज्य सदस्य भगवान वाघ, विभागीय अध्यक्ष राजेंद्र दांडगे,जळगाव शहराध्यक्ष सिद्धू चव्हाण ,जळगाव श्रमिक अध्यक्ष संजय सांगळे , जळगाव महिला जिल्हाध्यक्ष अनिता सांगोळे, प्रदिप अहिरे भुसावळ , सुरेश सुरडकर अमळनेर, जे बी जाधव जळगाव , सुरेश सपकाळ जळगाव आदिंची उपस्थिती होती , चेतन अढळकर यांच्यावर निवडी बद्द्ल सर्व समाज बांधवांनी शुभेच्छाचा वर्षाव केला.