मास्को : वृत्तसंस्था
रशिया आणि युक्रेनमधील वाद मिटण्याऐवजी इतका टोकाला गेला की त्याचे परिणाम युद्धात दिसून येत आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आणि युक्रेनमधील शहरांवर हल्ले सुरु केले आहेत. त्यात 7 नागरिक ठार झाले असून 9 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, युक्रेनने रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले आहे. रशियाची पाच लष्करी विमाने पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
रशियाकडून जोरदार लष्करी कारवाई करण्यात येत आहे. युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घरी निघून जा असेही रशियाने बजावले आहे. इतकेच नाही तर अमेरिकेसह इतर युरोप देशमध्ये पडल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रशियाने दिला आहे. रशियाच्या युद्धानंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये शहर हल्ल्याखाली असल्याचे दर्शवणारे एअर रेड सायरन्स वाजले आहेत.
डोनबासमध्ये स्पेशल ऑपरेशन करण्याची पुतीन यांनी घोषणा केली आहे. यूक्रेन आर्मीने शस्त्र टाकावी आणि घरी जावे, असे पुतीन यांनी म्हटले आहे. आमचा यूक्रेनवर कब्जा करण्याचा इरादा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने युद्धाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राने पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे.
युक्रेनचे पाडले दोन तुकडे
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव कायम आहे. याबाबत युरोपसह पाश्चात्य देशांनी दोन्ही देशांना चर्चा करुन तोडगा काढण्यास सांगितले होते. दरम्यान, रशियाने युक्रेनमधील दोन प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. यानंतर अमेरिका आणि युरोपसह इतर देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. तरीही रशियाने माघार घेतलेली नाही. युद्धाची घोषणा केली आहे.
कब्जा करण्याचा इरादा नाही
निर्बंध असतानाही रशियाने आज युद्धाची घोषणा केली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी औपचारिकपणे युद्धाची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जग ठप्प होईल. संयुक्त राष्ट्राने पुतीन यांना युद्ध थांबवण्यास सांगितले आहे. त्याचवेळी रशियावर कब्जा करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे पुतीन यांचे म्हणणे आहे.