कानळदा, किनोद, बिलवाडी ओबीसीसाठी राखीव

0
51

जळगाव : प्रतिनिधी
मुदत संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील ५६३ सरपंचपदासाठीचे आरक्षण सोडत आज तालुस्तरावर व महिला सरपंच पदांसाठी प्रांताधिकारी स्तरावर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या आरक्षण सोडतीबाबत ग्रामीण जनतेत कमालीची उत्सुकता दिसून आली.
जळगाव तालुका स्तरावरील सरपंच पदासाठीची सोडत आज सकाळी ११ वा. पंचायत समिती कार्यालयात काढण्यात आली. संमेत योगेश नन्नवरे या विद्यार्थ्याने सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या. त्यावेळी सभागृहातील ग्रामीण भागातील इच्छुक सरपंचांच्या चेहर्‍यावर उत्सुकता दिसून आली. आज झालेल्या सोडतीत हाती आलेल्या वृत्तानुसार सावखेडे बु. (एस.टी.), दापोरे (ओबीसी), धानोरे बु. (सर्वसाधारण), कानळदा (ओबीसी), जळगाव खुर्द (एस.सी.), वडनगरी (सर्वसाधारण), किनोद (ओबीसी) , वसंतवाडी (ओबीसी), निमगाव बु. (ओबीसी), बिलवाडी (ओबीसी), लोणवाडी बु. (एस.टी.), आमोदे बु. (ओबीसी), बेळी (ओबीसी) अशी सोडत निघाली आहे.
दरम्यान, आसोदा, वडली, शिरसोली प्र.न., धानवड, नशिराबाद, सुजदे, घार्डी, रिधूर, देऊळवाडे, फुकनी या ग्रामपंचायती स्त्री राखीवसाठी दुपारी २ वाजेच्या सोडतीत चिठ्ठ्या टाकण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
पाचोरा तालुक्यातील आरक्षण
पाचोरा तालुक्यातील सरपंच पदांसाठी अनुसूचित जाती ( एस सी) एकूण ७ जागा, अनुसूचित जमाती (एस टी) एकूण १० जागा,नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) २७,  एकूण राखीव जागांची संख्या ४४,उर्वरित ५६ जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत.
अनुसूचित जाती ( एस सी) एकूण ७ जागा
१९९५ ते २०१५पर्यंत एकूण ३८ गावांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे. ही गावे वगळून उर्वरित गावातील एस सी लोकसंख्या नुसार असलेल्या गावातून आरक्षण निश्चित
१) नाचनखेडा, २) शिंदाड,३) बदरखे, ४) कोल्हे, ५) भोरटेक खुर्द, ६) गाळण बुद्रुक, ७) पिंप्री खुर्द प्र पा
अनुसूचित जमाती (एस टी) –
१) साजगाव, २) वडगाव आंबे, ३) गाळण खुर्द, ४) बांबरुड प्र बो, ५) भोजे, ६) सामनेर, ७) निंभोरी बुद्रुक, ८) वडगाव कडे, ९) सारोळा बुद्रुक, १०) दहिगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) –
१) पिंप्री बुद्रुक प्र पा, २) चिंचखेडे खुर्द, ३)वखाजोळे, ४) लोहटार, ५) कळमसरा, ६) बभातखंडे खुर्द, ७) गोरडखेडा बुद्रुक, ८) दिघी, ९) कुर्‍हाड खुर्द, १०) आसनखडे बुद्रुक, ११) माहेजी, १२) वरसाडे प्र पा, १३) अंतुर्ली प्र पा , १४) वेरुळी बुद्रुक, १५) डांभुर्णी, १६) तारखेडा खुर्द, १७) बाळद बुद्रुक, १८) परधाडे, १९) वडगाव खुर्द प्र पा,२०) वाडी, २१) सांगवी, २२) खेडगाव, २३) टाकळी बुद्रुक, २४) ओझर, २५) लोहारा बुद्रुक, २६) वाणेगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here