Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»स्वामी विवेकानंदांवरील साहित्य विक्री रथ आजपासून जळगावात
    जळगाव

    स्वामी विवेकानंदांवरील साहित्य विक्री रथ आजपासून जळगावात

    saimat teamBy saimat teamFebruary 1, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । साहित्य, संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत विशेष रस असणारे तसेच पाश्चात्त्य आणि भारतीय धर्मांशी जोडले गेलेले व्यक्तिमत्त्व व युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे स्व.स्वामी विवेकानंद. जळगावातील श्री रामकृष्ण मिशनचे सर्व भक्त व श्री रामकृष्ण मिशन मठ, पुणे यांच्या वतीने तसेच प्रा.डॉ.रमेश झोपे, श्रीकांत देशपांडे, श्रीधर इनामदार, प्रकाश गलवडे यांच्या अनमोल सहकार्यातून स्व.स्वामी विवेकानंदांवरील साहित्य विक्री रथ उद्या बुधवार,दि. २ फेब्रुवारी २०२२ रोजी जळगावात दाखल होत आहे.

    जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन या रथाचे शहरातील काव्यरत्नावली चौकात सकाळी साडेदहाच्या सुमारास यथोचितपणे स्वागत करून हा सोहळा साजरा करणार आहेत. हा रथ रविवार, दि.20 फेब्रुवारी 2022 पर्यंत दररोज सकाळी 9 ते रात्री 8.30 या वेळेत नियोजनाप्रमाणे ठरवून दिलेल्या शहरातील भागात उभा असणार आहे. त्यामुळे जळगावकरांना स्व.स्वामी विवेकानंदांवरील साहित्य खरेदीचा आनंद घेता येणार असल्याने या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे श्री रामकृष्ण मिशनच्या सर्व भक्त परिवारातर्फे कळविण्यात आले आहे.

    जळगाव शहरात रथ उभा राहण्याची ठिकाणे अशी :
    2, 3, 6 व 13 फेब्रुवारी: काव्यरत्नावली चौक, 4 फेब्रुवारी: मू. जे. महाविद्यालय परिसर व रामदास कॉलनी, 5 फेब्रुवारी: गांधी उद्यान, 7 व 8 फेब्रुवारी: स्टेडियमच्या बाजूला, 9 फेब्रुवारी: शिवतीर्थ मैदान, 10 व 11 फेब्रुवारी: सागर पार्क, 12 फेब्रुवारी: नेहरू चौक, 14 व 15 फेब्रुवारी: नवजीवन मेगा मार्ट, मानराज पार्क, 16 व 17 फेब्रुवारी: बजरंग बोगदा, 18 व 19 फेब्रुवारी: एलआयसी ऑफिसजवळ, ख्वाजामियाँ चौक, 20 फेब्रुवारी: डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.