जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीर प्रशासनाने सुरक्षेचे आश्वासन देऊनही खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे स्थलांतर सुरू झाले आहे. उत्तर काश्मीरमधील संक्रमण शिबिरापासून ते शेखपोरा बडगामच्या हाय-प्रोफाइल निवासस्थानापर्यंत सर्वत्र शांतता आहे. प्रशासन स्थलांतराचे वृत्त नाकारत असेल, पण घरांना लावलेली कुलूपे त्याची साक्ष देत आहेत.खोऱ्यात 5,900 कर्मचारी आहेत. त्यापैकी 1,100 निर्वासितांच्या शिबिरात व तर 4700 खासगी निवासस्थानात राहतात. निर्बंध असूनही यातील 80 टक्के कर्मचारी काश्मीर सोडून जम्मूमध्ये पोहोचले आहेत.
या स्थितीतही अनंतनाग, बारामुल्ला, श्रीनगरमधील शिबिरांमध्ये राहणारी अनेक कुटुंबे बाहेर पडू शकत नाहीत. कारण प्रशासनाने त्यांना बाहेर पडण्यास बंदी घातली आहे.
कर्मचारी तणावात, कारण सांगून बाहेर
राज्यपाल मनोज सिन्हा यांना भेटलेल्या प्रतिनिधींतील एका काश्मीरी पंडिताने सांगितले की, आम्ही सारे तणावात आहोत. काय घडत आहे? हत्या कोण करत आहे, हे कोणालाच माहीत नाही. अन्य एका कर्मचाऱ्याने सांगितले की, 12 वर्षांपूर्वी आम्ही आलो तेव्हा स्वत:ला सरकारचे अँम्बेसेडर मानायचो. मात्र आम्हाला कर्मचाऱ्यांच्या रुपात स्विकारले गेले नाही. त्यामुळे आम्ही परतण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनगरमध्ये जवळपास 500 कर्मचारी आहेत. कोणाकडेही सरकारी घर नाही.