Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»बनोटी महसूल मंडळातील ४३ गावांना ‘पोखरा’ योजनेतून वगळले
    कृषी

    बनोटी महसूल मंडळातील ४३ गावांना ‘पोखरा’ योजनेतून वगळले

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 27, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोयगाव तालुक्यातील २१ गावांची निवड

    साईमत/सोयगाव/प्रतिनिधी

    नानाजी देशमुख कृषी संजीवनी या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या टप्पा क्र. दोनसाठी सोयगाव तालुक्यातील २१ गावांची निवड केली आहे. बनोटी महसूल मंडळातील ४३ गावांना मात्र त्यातून वगळण्यात आले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नानाजी देशमुख कृषी संजीवनी या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा टप्पा क्र. दोनसाठी राज्यातील विविध गावांची निवड केली होती. या योजनेसाठी सोयगाव तालुक्यातील जरंडी, माळेगाव, पिंपरी, कंकराळा, रावेरी, सोनासवाडी, गलवाडा, आमखेडा, वरखेडी (खु), पळसखेडा, धनवट, जंगलातांडा, फर्दापूर, चोंडेश्वर, वरखेडी (बु), ठाणा, मोलखेडा, राकसा, हिंगणा, जामठी अशा २१ गावांची निवड केली आहे. सोयगाव महसूल मंडळातील आमखेडा, गलवाडा, माळेगाव, पिंपरी, कंकराळा, सोनसवाडी सहा गावांनाही वगळण्यात आले आहे.

    बनोटी महसूल मंडळातील ४३ गावांना मात्र या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बनोटी मंडळात आधीच खरीपाच्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असताना शासनाच्या योजनेतूनही वगळण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या योजनेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये गावस्तरीय समित्या गठित करणे क्रमप्राप्त आहे. परंतु कृषी आणि महसूल विभागाने अद्यापही यासाठी कोणतीही संयुक्त बैठक घेतली नाही. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी कधी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

    काय आहे पोखरा योजना

    शेतकरी योजनेत बांधावर, गटात वृक्ष, फळबाग लागवड करू शकतात. शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, शेततळे, ठिबक, तुषार सिंचन, विहीर, विहीर पुनर्भरण, सिमेंट नाला, बांध आदी कामे करू शकतात. यासाठी शासन अनुदान देते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या ८० वाणांचे थेट प्रात्यक्षिक

    February 3, 2026

    Citrus Fruit Plants : लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी : डॉ. एन. के. कृष्णकुमार

    December 23, 2025

    ‘Green Color Day’ : काशिनाथ पलोड पब्लिक स्कुलमध्ये ‘ग्रीन कलर डे’ साजरा

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.