Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»केळी उत्पादकांना विमा नुकसान भरपाई हेक्टरी ४३ हजार ५०० रुपये द्यावी
    कृषी

    केळी उत्पादकांना विमा नुकसान भरपाई हेक्टरी ४३ हजार ५०० रुपये द्यावी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 6, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत १ मे ते ३१ मे च्या दरम्यान तापमान सलग पाच दिवस ४५ डिग्रीपेक्षा जास्त असल्याने विमा कराराच्या निकषानुसार जिल्ह्यातील सर्व ८६ महसूल मंडळामधील विमाधारक केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४३ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

    जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकरी हा वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसह व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीमुळे त्याचा आर्थिक कणा पूर्णता मोडला गेलेला आहे. बहुतांश पीडित केळी उत्पादक शेतकऱ्यांना २०२२-२३ चा पिक विमा अजूनही मिळालेला नाही. यावर्षी जिल्ह्यात ५८ हजार ७३३ हेक्टरवर ५६ हजार ३६१ शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना कमी व उच्च तापमानाची नुकसान भरपाई म्हणजे १ नोव्हेंबर २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ मध्ये तापमान सलग तीन दिवस आठ डिग्रीपेक्षा कमी असल्याने जिल्ह्यातील ३६ महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी २६ हजार ५०० नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे. १ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान तापमान सलग पाच दिवस ४२ डिग्रीपेक्षा जास्त असल्याने जिल्ह्यातील ७५ महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे.

    परंतु मे महिन्यात १ मे ते ३१ मे दरम्यान तापमान सलग पाच दिवस ४५ डिग्रीपेक्षा जास्त असल्याने विमा करारानुसार विमाधारक केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४३ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी डॉ.विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर शेतकऱ्यांचा महामार्गावर उग्र रस्ता रोको आंदोलन

    February 3, 2026

    Jalgaon : फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या ८० वाणांचे थेट प्रात्यक्षिक

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.