साईमत, शिरपूर, प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीची शिरपूर शहर मंडळ, सांगवी मंडळ, शिरपूर ग्रामीण मंडळ अध्यक्षपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. प्रदेश उपाध्यक्षा तथा धुळे जिल्हा प्रभारी माजी आ. श्रीमती स्मिताताई वाघ, धुळे ग्रा.जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर उद्योगपती चिंतनभाई पटेल, धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, शिरपूर कृउबा समिती सभापती के. डी. पाटील, बोराडी उपसरपंच राहुल रंधे आदी उपस्थित होते. बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना धुळे भाजपा जिल्हा प्रभारी श्रीमती स्मिता वाघ म्हणाल्या की, येणारा काळ निवडणुकीचा असून अध्यक्षपदाला न्याय देण्याची अनेक कार्यकर्त्यांत क्षमता आहे.
मात्र पद एकालाच देता येते ही अडचण लक्षात घेवून तालुका अध्यक्षाला सर्वांनी साथ देवून भाजपाचे संघटन मजबूत करावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजपाला निष्कलंक नेतृत्व लाभले. त्यांच्या नेतृत्वातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती गावागावात वाडीवस्तीत कार्यकर्त्यांनी पोहचविली पाहिजे. पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपाचा खासदार बहुमतांनी विजयी होण्यासाठी त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्वांनी कार्यरत रहावे. जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करावे, असे आवाहन केले.
बैठक रविवारी आमदार कार्यालय, करवंद रोड शिरपूर येथे झाली. भाजपा शहर मंडळ 17, सांगवी मंडळ 6 व शिरपूर ग्रामीण मंडळ 16 असे एकूण 39 जणांनी अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी मुलाखती दिल्यात. बैठकीला शिरपूर पं.स.सदस्य चंद्रकांत पाटील, शिरपूर पं. स. माजी सभापती सत्तारसिंग पावरा, कृउबा समिती संचालक मिलिंद पाटील, भाजपा व्यापारी आघाडी माजी जिल्हाध्यक्ष एन.डी.पाटील, तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, तालुका उपाध्यक्ष भास्कर बोरसे, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, नरेश पवार, प्रसन्न जैन, नितीन राजपुत, मुबीन शेख, सुनील चौधरी, सतीश गुजर, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, अनिल बोरसे, संजय पाटील, पिंटू बंजारा, मनोज राजपुत, गणेश भावसार, अमळनेर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भूषण देवरे, भटू माळी, राहुल देवरे, अनिल पाटील, लोटन पाटील, रफीक तेली, प्रशांत राजपुत, अविनाश शिंपी, राहुल ईशी, हेमंत सनेर, अजिंक्य शिरसाठ, योगेश बादल, राधेश्याम भोई, कान्हा चारण, योगीराज बोरसे, किशोर चव्हाण, राहुल माळी, शिरपूर शहर, तालुका मंडळतील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगर सेवक, सरपंच, विविध संस्थातील पदाधिकारी, पक्षाचे जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी, विविध मोर्चा, आघाड्याचे पदाधिकारी व मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते.